Maharashtra Vidhansabha Election 2024 :   लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा धडा घेत भाजपनं प्रचाराची रणनितीत मोठा बदल केलाय. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकनं नवीन व्यूहरचना तयार केलीय. या नवीन रणनितीमध्ये टूलकिट हा  कळीचा शब्द असणार आहे. विधानसभा मतदारसंघ असा फोकस न करता पंचायत समिती सर्कलवर फोकस केले जाणार आहे. निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या नेत्यांना लोकसभेत डावललं गेल्याचा तक्रारी आल्यानं आता अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या भाजपची रणनिती कशी आहे ते पाहूयात. 


कसा आहे भाजपचा फॉर्म्युला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बूथप्रमुख रचना कायम ठेवत त्याला वेगळी समांतर रचना
-प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्की राजकीय समज असणा-या 15 जणांची टीम 
-टूलकीट क्रमांक-1 निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार  
-टूलकीट क्रमांक-2 15 जणांपैकी प्रत्येक जण 300 जणांची टीम तयार करेल
-300 जण मग प्रत्येकी 150 या प्रमाणे 45 हजार जणांच्या टीम तयार करतील
-प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 1500 महिलांच्या उपस्थितीत 15 मेळावे


केंद्रीय नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्यासह इतर अनेक नव्या मुद्द्यांचा समावेश नव्या रणनीतीमध्ये करण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबईत प्रभारींसह राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक भाजपच्या प्रदेश मुख्यालयात पार पडणार आहे.. तब्बल पंचेचाळीस हजार कार्यकर्त्यांचं जाळं विणून विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग भाजपने बांधलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या पराभवानंतर आता संघानंही विधानसभा निवडणुकीसाठी पुढाकार घेतल्यानं विधानसभा निवडणुकीच्या मैदानात भाजप पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं दिसून येतंय