Traffic changes in Pune for PM Modi's rally : महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर लक्ष ठेवून असणारे आणि दिल्लीतून राजकारणातील सूत्र हलवणारे अनेक दिग्गज सध्या राज्यात सातत्यानं येताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदीसुद्धा यात मागे नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर PM Modi मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाहीर सभेच्या माध्यमातून मोदी जनतेला संबोधित करतील. तत्पूर्वी पुणे शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीला केंद्रस्थानी ठेवत नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या पटांगणात पंतप्रधानांची जाहीर सभा होणार असून इथं ते भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसतील. 


पंतप्रधान पुण्यात आल्यानंतर त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा एकंदर प्रवास पाहता त्या अनुषंगानं पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येतील. याच धर्तीवर पुण्यातील 13 महत्त्वाच्या रस्त्यांवर मंगळवारी वाहतूकव्यवस्थेतील गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : उष्णतेचा आगडोंब कायम; राज्याचा 'हा' भाग मात्र अपवाद, इथं गारठा आणखी वाढणार 


वाहतूक व्यवस्थेतील बदल खालीलप्रमाणे.... 


- नासी फडके चौक ते नाथ पै चौक प्रवेश बंद 
पर्यायी मार्ग म्हणून नासी फडके चौकाकडून डावं वळण घेऊन निलायम ब्रिजखालून सिंहगड मार्गानं पुढे जावं 
नाथ पै चौक ते सिंगगड रोड जंक्शनहून सरळ पुढे जाण्याचीही व्यवस्था... 


- बाबुराव घुले मार्गावरून टिळक माहविद्यालयाच्या पुढे आंबील ओढा जंक्शनकडे प्रवेश बंद 
पर्यायी मार्ग म्हणून टिळक महाविद्यालय चौकातून डाव्या वळणानं जॉगर्स पार्क मार्गानं शास्त्री मार्गानं इच्छित स्थळी जावं 



मंगळवारी पुण्यात टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार असून, यामुळे वाहनचालकांना काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावं लागणार आहे. डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जाण्याचा मार्ग खुला असेल.