Video Viral : कीर्तन चालू असताना गावातल्या पोरांनी नारळासोबत जे केलं ते पाहून डोक्याला लावाल हात
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की तीन - चार मुलं बसलेली असल्याचं दिसत आहे. त्यांच्यामध्ये एक शेंडी सोललेला नारळ ठेवलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर करामती मुलं काय करतात पाहा Viral Video
Viral Video : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असे असतात की ते पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण जातं. ग्रामीण भागातील काही मुलं त्यांच्या करामतींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. तुम्ही आतापर्यंत अनेक वेळा देवाला किंवा कोणत्याही समारंभावेळी नारळ फोडला आहे. नारळ फोडून अनेक शुभकामांची सुरूवात करतात. नारळ फोडण्यासाठी दगड असतो. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तरूण ज्या प्रकारे नारळ फोडत आहे ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
नेमक कसा फोडतो नारळ?
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की तीन - चार मुलं बसलेली असल्याचं दिसत आहे. त्यांच्यामध्ये एक शेंडी सोललेला नारळ ठेवलेला पाहायला मिळत आहे. त्यांच्यामधील एक तरूण फोडू का विचारतो आणि एका बुक्कीत नारळ फोडतो. कोणी कल्पनाही केली नसेल की एका बुक्कीत नारळ फुटेल पण खरं आहे.
तरूणाने आत्मविश्वासाने एका बुक्कीत नारळ फोडला, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच असल्याचं दिसत आहे. कारण नारळ फोडताना ज्या ठिकाणी तरूण बसले होते त्यांच्या पाठीमागे कीर्तन सुरू असल्याचा आवाज येत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. तुम्ही असं काही घरी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण असं काही करायला गेलात तर तुम्हाला इजाही होण्याची शक्यता आहे. चुकून नारळ फुटल्यावर त्याची कवटी तुमच्या हाताला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे फक्त मनोरंजन म्हणून पाहा आणि सोडून द्या.