मुंबई : दुष्काळाचा सामना करण्यासाठी मंत्रालयामध्ये मदत आणि पुर्नवसन विभागाने 'वॉर रुम'ची स्थापना केली आहे. दुष्काळी भागात राज्य सरकारच्यावतीनं सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये रोजची परिस्थिती काय आहे? टँकरची स्थिती, दुष्काळ भागातील रोजगार हमी योजनेवर किती लोकं कामावर आहेत? याचा अपडेट या 'वॉररूम'मधून ठेवला जाणार आहे. यामुळे एका ठिकाणीच राज्यातील दुष्काळ परिस्थितीची ताजी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक प्रणालींसह ही वॉररुम दुष्काळाशी दोन हात करणार आहे. विशेषतः चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी यावेळी 'कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम' (cattle camp management system) हे मोबाईल ऍपलिकेशनही विकसित करण्यात आलंय. तसंच चारा छावण्यातील पशुधनाच्या कानावर टॅग लावण्यात आला आहे, ज्यामध्ये बारकोडही आहे. यामुळे चारा छावण्यांच्या चालकाला छावणीमध्ये नेमकी किती जनावरे आहेत? याची माहिती ठेवता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी चारा छावण्यांबाबत मंडल, तालुका, जिल्हास्तरावर मग विभागीय आयुक्त स्तरावर माहितीची संकलन करत ताजी माहिती दिली जात होती. मात्र आता www.charachavni.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं असून जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना थेट माहिती भरता येणार आहे. 


गावांत तसंच वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात किती टॅकर, नेमके कुठे सुरु आहेत, रोजच्या फेऱ्या किती? याची माहिती मंत्रालयातील 'वॉर रुम'ला थेट मिळणार आहे.


हे मोबाईल ऍपलिकेशनही विकसित करण्यात आलंय. तसंच चारा छावण्यातील पशुधनाच्या कानावर टॅग लावण्यात आला आहे, ज्यामध्ये बारकोडही आहे. यामुळे चारा छावण्यांच्या चालकाला छावणीमध्ये नेमकी किती जनावरे आहेत? याची माहिती ठेवता येणार आहे. ही माहिती दिवसातून एकदा संगणकीय प्रणालीद्वारे अपलोड करणं छावणी मालकाला बंधनकारक करण्यात आलं आहे. 


याआधी चारा छावण्यांबाबत मंडल, तालुका, जिल्हास्तरावर मग विभागीय आयुक्त स्तरावर माहितीची संकलन करत ताजी माहिती दिली जात होती. मात्र आता www.charachavni.com हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं असून जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना थेट माहिती भरता येणार आहे. 


गावांत तसंच वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात किती टॅकर, नेमके कुठे सुरु आहेत, रोजच्या फेऱ्या किती? याची माहिती मंत्रालयातील 'वॉर रुम'ला थेट मिळणार आहे.



राज्यात सध्या १२६४ चारा छावण्या सुरू आहेत. यामध्ये आत्तापर्यंत तब्बल ८,३२,०२९ जनावरे दाखल झालेले आहेत. इथे मोठ्या जनावरांना प्रत्येक दिवशी १८ किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जाणार आहे. तर लहान जनावरांना ९ किलो चारा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यासाठी प्रत्येक मोठ्या जनावरामागे दिवसाला ९० रुपये तर लहान जनावरांसाठी दिवसाला ४५ रुपये अनुदानही मंजूर करण्यात आलंय.