Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?
![Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा? Maharashtra Weather News : मुंबईसह राज्याच्या किनारपट्टी भागात उष्णतेच्या झळा, कधी कमी होणार उकाडा?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2025/01/28/838567-muaiclimatenwas.png?itok=D3dGO8Oq)
Maharashtra Weather News : राज्यातील किमान तापमानाचा आकडा आता वाढत असून, 10 अंशांवर पारा गेल्यानं थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.
Maharashtra Weather News : मागील 24 तासांमध्ये राज्यासह देशातील तापमानात बऱ्याच अंशी चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळालं. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढला, तर कुठे किमान तापमानात किंचित घट झाली. वातावरणाचा एकंदर अंदाज पाहिल्यास राज्यातून आता थंडीचा लपंडाव सुरू झाल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पहाटेच्या वेळी हलका गारठा आणि धुक्यांची चादर पाहायला मिळत आहे. तर कमाल तापमानानं रत्ना गिरी इथं 36 अंशांचा आकडा गाठल्यानं थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असून, उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे. दरम्यान, दक्षिण भारतात सक्रिय असणारं ईशान्य मोसमी वाऱ्यांचं सत्र संपुष्टात आलं असून, वायव्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मात्र अधिक आहे. परिणामी देशाच्या उत्तरेकडील पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. मैदानी क्षेत्रावर याचा किमान परिणाम दिसून येत आहे.
मुंबईसह कोकणाचा ताप वाढला...
दरवर्षी जानेवारी महिन्यात मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये तुलनेनं अधिक गारठा पाहाला मिळतो. पण, यंदाचं वर्ष मात्र अपवाद ठरत असून, सर्वात उष्ण जानेवारीची नोंद करण्यात येत आहे. नुकत्याच नोंद करण्यात आलेल्या माहितीनुसार जानेवारीच्या अखेरीपर्यंत हवामानाची ही स्थिती मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात कायम राहणार असून इथं सरासरी तापमानाचा आकडा 33 ते 34 अंशांदरम्यान राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या परिणामुळं आणि काही प्रमाणात सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तापमानात झालेली ही वाढ पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा इशारा IMD नं दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 31 जानेवारीनंतर तापमानवाढीत काही अंशांची घट पाहायला मिळणार असल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
हेसुद्धा वाचा : Santosh Deshmukh: 'तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही?' अंजली दमानियांची भेटीत विचारणा, अजित पवार म्हणाले 'उद्याच CM ना...'
शहरातील किमान तापमान 17 ते 18 अंशांदरम्यान राहण्याचा प्राथमिक अंदाज असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा उकाडा जाणवल्यास यात आश्चर्य वाटण्याची बाब नाही हे खरं.