Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार

Maharashtra Weather News : मध्येच थंडी वाढतेय, उन्हाचा कडाका डोळ्यापुढं अंधारी आणतो आणि आता हा पाऊसही अडचणी वाढवतोय... राज्यातील कोणत्या भागावर दिसणार हवामान बदलांचे सर्वाधिक परिणाम?
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे बऱ्याच दिवसांपासून मुक्कामी असणारी थंडी आता दिवसागणिक आणखी वाढताना दिसत आहे. असं असतानाच मध्य भारत आणि उत्तरपूर्व भारतामध्ये मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र किमान तापमानाचा आकडा वाढत असून, थंडीचा प्रभाव काही अंशी कमी होताना दिसत आहे. तिथं दक्षिण भारतामध्ये तापमानातील चढ- उतार कायम असल्यामुळं काही किनारपट्टी क्षेत्रांवर पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत.
मागच्या वर्षभरात ज्याप्रमाणं मान्सून वगळताही पावसानं हजेरी लावली होती, त्याचप्रमाणं यंदाही हीच स्थिती टीकून असल्याचं आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानाचा आकडा वाढला असून थंडी काढता पाय घेताना दिसत आहे. असं असलं तरीही उन्हाचा दाह मात्र पाठ सोडत नसल्याचंही नाकारता येत नाहीय.
सततच्या या हवामान बदलामुळं राज्यावर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला असून, फेब्रुवारीची सुरुवातही पावसानंच होण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या पहाटेची वेळ वगळता उर्वरित दिवस उष्मा जाणवण्यास सुरुवात झालीय. तर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहाटेच्या वेळी धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय. शनिवारनंतर राज्यातील हवामानात मोठे बदल दिसणार असून, पावसासाठी आतापासून पोषक होत जाणाऱ्या वातावरणात पुढील 48 तासांत भर पडून पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या राही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.
हेसुद्धा वाचा : जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल