Maharashtra Weather News : सावध व्हा! पावसासोबतच, ताशी 40 - 50 किमी वेगानं वाहणारे वारे धडकी भरवणार
Maharashtra Weather News : राज्यात पावसानं हजेरी लावलेली असताना हा पाऊस आता बहुतांश भागांमध्ये अविरत बरसताना दिसत आहे. पण, काही भागांमध्ये मात्र तो धडकी भरवतानाही दिसत आहे.
Maharashtra Weather News : कोकणापासून मराठवाड्यापर्यंत सध्या सर्वत्र पावसानं हजेरी लावली असून, हा पाऊस राज्याच्या काही भागांमध्ये आणि विशेष म्हणजे घाटमाथ्यावरील परिसरांमध्ये अविरत बरसताना दिसत आहे. बहुतांश क्षेत्रांमध्ये शेतीच्या कामांना वेग आलेला असतानाच हवामान विभागानं राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाची हजेरी असेल अशी स्पष्ट शक्यता वर्तवली आहे.
पुढील 24 तासांसाठी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणारे वारे अडचणी निर्माण करु शकत असल्यामुळं हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हेसुद्धा वाचा : विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईत ठाकरेंचे दोन्ही शिलेदार विजयी
तिथं कोकणात पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळणार असून, इथं काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, साताऱ्यातील घाटमाथ्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासमवेत सध्या देशभरात हवामानात महत्त्वाचे बदल झाले असून, आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार दिल्लीमध्ये पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट लागू असेल. तर, याच काळात राजस्थानच्या भरतपुर, जयपुर, उदयपुर, कोटा भागामध्ये पावसाची अंशत: हजेरी पाहायला मिळेल.
उत्तराखंडमध्ये पाऊस अडचणी निर्माण करताना दिसू शकतो. त्याच धर्तीवर इथं प्रशासनानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. या राज्यात कुमाऊं भागामध्ये अतिमुससळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रालगत असणाऱ्या गुजलरातच्या काही भागांमध्येसुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्चात आला आगे. येथील सूरत, नवसारी, वलसाड सोबत कच्छच्या जामगर, पोरबंगर, जूनागढ, द्वारका भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.