Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव हा पावसानं गाजवण्यास सुरुवात केली आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. शुक्रवारपासूनच मुंबई शहरापासून उपनगरांपर्यंत सुरु असणाऱ्या पावसानं कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रही व्यापला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या विदर्भ पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून, बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या ही प्रणाली तयार होताना दिसत आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर, कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे, ज्यामुळं कोकणात गौराईचं आगमन पावसाच्या हजेरीतच होणार यात शंका नाही. तिथं, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.


हेसुद्धा वाचा : 'भागवतांनी 'देवा'चे कान टोचले', मोदींना टोला; म्हणाले, 'अवतारी पुरुष 20000 कोटींच्या...'


 


उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील पावसालाही वादळी वाऱ्यांची साथ असल्यामुळं नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.