Maharashtra Weather : देशाच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानात लक्षणीय बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिवाळा सरून आता उन्हाळा ऋतू सर्वांनाच अपेक्षित होता. पण, तसं काहीच झालं नाही. उलटपक्षी महाराष्ट्रासह देशभरात पावसानं हजेरी लावली आणि अवकाळीचा तडाखा सर्वांनाच हैराण करून गेला. एप्रिल महिना उजाडलेला असताना तरी आता हा पाऊस पाठ सोडणार का? हाच प्रश्न अनेकांना पडला. पण, अद्यापही हवामानाची ती तयारी दिसत नाही. (Maharashtra Weather satara to get heavy rain for next 3 days india rain predictions Amid summer latest Marathi news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सातारा, महाबळेश्वर, पाचगणी (Mahabaleshwar, Panchgani) भागात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर या भागात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतही पाणीच पाणी झालं. या अवकाळी पावसाचा फटका स्ट्रॉबेरी पिकाला बसणार असल्यामुळं सध्या बागायतदारांवर वेगळंच संकट ओढावलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं सातारा जिल्ह्यात पुढचे 3 दिवस पावसाचा इशारा दिला आहे. 


पुण्यात उन्हाळा...


तिथं पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं तापमान वाढीची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाची दाहकता वाढत असल्याचं आढळत आहे. गुरुवारी पुण्यात तापमानानं 40.2 इतकं तापमान नोंदवण्यात आलं असून, हे राज्यातील चंद्रपूरनंतरचं सर्वाधिक तापमान ठरलं आहे. 


देशात का दिसून येतायत इतके हवामान बदल? 


पश्चिमी झंझावातामुळं देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. देशाच्या काही भागांत पाऊस तर, काही भागांत हिमवृष्टी होताना दिसत आहे. सुरुवातीला या वातावरणामुळं उन्हाळ्यापासून नागरिकांची सुटका झाली होती. पण, आता मात्र नागरिकांच्या आरोग्यावर या हवामान बदलांचे थेट परिणाम दिसून येऊ लागले आहेत. 


हेसुद्धा वाचा : राज्यातील 100 शाळांना कायमचं टाळं, पाहा तुमच्या जिल्ह्यातील किती शाळा? वाचा संपूर्ण यादी


पुढील आठवड्यामध्ये तूर्तास कोणताही सक्रिय नसेल अशीच माहिती हवामान विभागानं दिल्यामुळं त्या दिवसांत तापमानामध्ये काही अंशांची वाढ नोंदवली जाऊ शकते. स्कायमेटच्या वृत्तानुसार पुढील काही दिवस हवामान कोरडं असेल. यादरम्यान, तापमान वाढ झाली तरीही वातावरण सर्वसामान्य असेल. कमाल तापमान 30 ते 32 अंशांच्या घरात राहील. 


आज देशभरातील हवमानाची काय परिस्थिती? 


पुढील 24 तासांत देशातील हवमानाचा अंदाज वर्तवायचा झाल्यास, तेलंगाणा, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग, आसाम, अरुणाचल प्रदेश या भागांत पावसाची हजेरी असणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ या भागांमध्येही पावसाच्या तुरळत सरी बरसतील असी शक्यता वर्तवण्यात आली आहे.