Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Maharashtra Weather Update : अवघ्या एक- दोन दिवसांवर वीकेंड (Weekend Palns) अर्थात आठवड्याचा शेवट आणि आठवडी सुट्ट्यांची सुरुवात येऊन ठेपलेली असतानाच आता हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज मात्र चिंतेत भर टाकत आहे. हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या काही काळासाठी राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळीनं उघडीप दिली आहे. असं असलं तरीही या भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
सध्याच्या घडीला (Vidarbha) विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये किमान आणि कमाल तापमानातही वाढ होत असल्यामुळं मार्च महिना सुरु होण्यापूर्वीच उन्हाचा दाह जाणवू लागला आहे. परिणामी येत्या काळात राज्यात उकाडा दिवसागणिक वाढतच जाईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हवामानाच्या या प्रणालीचे परिणाम दिसून येणार आहेत. (Konkan) कोकणासह पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या भागांमध्येसुद्धा तापमानवाढ पाहायला मिळणार आहे. तर, राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रता अधिक असल्यामुळं उकाडा अपेक्षेहून जास्त जाणवणार आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रालगतच्या परिसरावर सध्या समुद्रसपाटीपासून साधारण 900 मीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिवसा तापमान जास्त राहणार असून, उत्तर महाराष्ट्र वगळता इतर भागातील जिल्ह्यांमधून थंडीनं आता जवळपास काढता पाय घेतल्याचं निश्चितच झालं आहे.
हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण: लोणार सरोवरचं कोडं सोडवण्यात NASA चे वैज्ञानिकही फेल
आठवडी सुट्टी तोंडावर असताना आता अनेकांनीच शुक्रवार धरून बाहेर जाण्याचे बेत आखले असतील. पण, सध्या मात्र तुम्ही थंडीची अपेक्षा ठेवून भटकंतीसाठी बाहेर पडणार असाल तर, मात्र मोठा हिरमोड होऊ शकतो. कारण, राज्यात सध्या उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं कुठंही जाण्याआधी त्या ठिकाणच्या तापमानाचा अंदाज घेणं योग्य असेल हे नक्की.
देशातही हवामान बदलांना सुरुवात
सध्या उत्तर भारतामध्येही थंडीचं प्रमाण कमी झालं असून, मैदानी क्षेत्रांमध्ये असणाऱ्या पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये थंडी कमी होणार असून, इथं विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Jammu Kashmir) जम्मू कश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख (Ladakh), हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागांमध्ये मात्र पुढील 48 तासांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात होणार असून इथं हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.