Maharashtra Weather News : राज्यात वैशाख वणवा; कोकणातील तापमान `इतक्या` फरकानं वाढणार
Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाली असून, सध्या तापमानाचा हा वाढता आकडा पाहता भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासन देत आहे.
Maharashtra Weather News : होळीला अग्नी दिल्यानंतर आता खऱ्या अर्थानं राज्यातील तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. किंबहुना मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच राज्यातील तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं वाढत होता. आता मार्चच्याच अखेरीस राज्यात यंदाच्या वैशाख वणव्याच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. ज्यामुळं काहीसा आधीच हा वैशाख वणवा सहन करावा लागणार असल्याची परिस्थिती राजच्यातील हवामानामुळं निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईचं तापमान 35 अंशावर गेलं आहे. पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात आणखी 2 ते 3 अंशाची वाढ होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्याशिवाय कोकणासह राज्याच्या काही भागात मंगळवारी आणि बुधवारी उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार असल्यामुळे नागरिकांनी उन्हात जाणं टाळावं आणि भरपूर पाणी प्यावं अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत.
राज्यात मुंबईसह उपनगरीय क्षेत्रासह विदर्भातही तापमानाचा आकडा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई आणि उपनगरांतील तापमान बुधवारपर्यंत 38 अंशावर पोहोचू शकतं. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे दोन्ही दिवस दमट आणि उष्ण हवा असण्याची शक्यता आहे.दरम्यान, राजच्यातील या वाढलेल्या उष्णतेचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसताना दिसणार आहे.
हेसुद्धा वाचा : Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या
राजस्थान आणि गुजरातमधील आर्द्र आणि उष्ण वारे गुजरातहून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरून थेट मध्य महाराष्ट्रापर्यंत येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत किनारपट्टीवरील तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळं या भागांमधील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. राज्यात फक्त दुपारच्याच वेळी नव्हे, तर आता रात्री आणि पहाटेही उकाडा जाणवू लागल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. पण, उन्हाच्या झळा सोसण्यावाचून आता काही पर्याय नाही हीच वस्तुस्थिती.
राज्याच्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असल्यामुळं त्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे असा प्राथमिक अंदाज.