Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात असणारं हवामानाचं चित्र काही केल्या बदलण्याचं नाव घेत नाहीये. सातत्यानं सुरु असणारा अवकाळी पाऊस, बहुतांश भागांमध्ये होणारी (Hailstorm) गारपीट या साऱ्यामुळं राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसानं (Rain News) हिरावून नेल्यामुळं शेतकऱ्यांची संकटं आणखी वाढली आहेत. बहरलेल्या शेतशिवाराचं अवकाळीनं बदललेलं रुप पाहावत नाही, अशीच अवस्था सध्या राज्यातील बळीराजाची झाली आहे. (Maharashtra Weather Update rain and hailstorm predictions at some latest Marathi news )


आठवडाभर अवकाळी... ढगांचं सावट दूर जाईना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. यात कांदा, गहू, मका, बाजरी, मिरची पीक उद्ध्वस्त झालं. तर शेतात ओल तशीच असल्यानं आडवी झालेली पिकं जागेवरच कुजण्याची भीती व्यक्त केली आहे. धुळ्यातही परिस्थिती अशीच. (Maharashtra Weather News ) 


धुळे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपलं. या माऱ्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान या पावसानं केलं. जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजारांहून जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 5 हजार हेक्टर पेक्षा अधिक शेत जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. 


अमरावतीतही वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. ज्यामुळं गहू, चणा, संत्रा पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर विटभट्टी व्यावसायिकांनाही याचा तडाखा बसणार आहे. नागपुरात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस झाला. 3 दिवसांपूर्वीच हवामान विभागानं अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार नागपूर शहरासह ग्रामीण भागात कळमेश्वर काटोल भागात पाऊस झाला. तर काही भागांत गारपीट झाली. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather: गारपिटीचा तडाखा पण पंचनामे रखडले, मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघताय ना?


 


तिथे (Satara) सातारा आणि कोल्हापूरातही रविवारी ढगाळ वातावरण पाहायला मिळालं, तर कोकण (Konkan) किनारपट्टी भागातही ढगाळ वातावरणानं आंबा बागायतदारांची चिंता वाढवली. मुंबईत तापमान चांगलंच वाढल्याचं पाहायला मिळालं. ढगांचं सावट, तापमानात होणारे चढ उतार आणि प्रदूषण या साऱ्यामुळं शहरी भागातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. 


देशातील हवामानाची काय परिस्थिती? (Weather news india )


IMD च्या वृत्तानुसार उत्तराखंडमध्येही एकाएकी हवामानात बदल झाले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारपासून सुरु झालेला पाऊस रविवार आणि सोमवारी सकाळपर्यंत कायम होता. सोमवार आणि त्यापुढील दोन दिवस या भागामध्ये हवामानात लक्षणीय बदल नोंदवले जाऊ शकतात. इथल्या बहुतांश भागामध्ये गारपीट आणि काही भागांमध्ये हलक्या बर्फवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.