Monsoon Return Journey : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवेतील आर्द्रता कमी झाली आहे (Maharashtra Weather Forecast). भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दुपारी जाहीर केले की, शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमधून मान्सून माघारला आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे. IMD नकाशावरील परतीचा मार्ग सतना, नागपूर, पुणे, मुंबई आणि अलिबागमधून जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्र, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तीन ते चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. पुढील काही दिवस राज्यातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. राज्याच्या ४५ टक्के भागातून मान्सून परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यातून निघून जाईल.


संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील


गेल्या दोन दिवसांत पुणे शहरातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून उष्मा वाढला आहे. शुक्रवारी दुपारी रस्त्यावरून चालताना उन्हाचा तडाखा जाणवतो. रात्री थंडी जाणवते. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पहाटे शहरावर धुक्याची चादर कायम होती. दरम्यान, पुणे आणि परिसरात पुढील दोन दिवस मुख्यत: निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान राहील. संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.



ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस


जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, नवी दिल्ली, गुजरात या राज्यांमधून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेत आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेऊ शकतो. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असून तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.