राज्यपाल नियुक्त12 आमदार निवडीचा पेच सुटणार का?, आज निकाल
Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचाबाबत मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज दुपारी निकाल दिला जाणार आहे.
मुंबई : Governor appointed MLA : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचाबाबत मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आज दुपारी निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 12 आमदारांचं काय होणार, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी महाविकास आघाडीतर्फे राज्यपाल यांच्याकडे बंद पाकिटात पाठवण्यात आली. (Nomination of MLCs: Maharashtra govt submits list) मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. यावर नाशिकच्या रतन सोली यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
यावर युक्तीवाद झाला आणि उच्च न्यायालयाने देखील प्रश्न विचारले. मात्र निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय आज दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र विधान परिषदेवरील 12 आमदार सदस्यांच्या निवडीचा पेच सुटणार का, याकडे लक्ष लागले आहे. आज दुपारी 2.30 मुख्य न्यायमूर्ती निकाल देतील आणि 12 सदस्यांची वाट मोकळी होणार की अडसर कायम राहणार ते या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.