मुंबई :  शेतकरी आणि राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. जून महिन्यात पाऊस जोरदार बरसला. मात्र त्यानंतर पावसाने काही दिवसांसाठी दडी मारली. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. त्यात आता शेतकऱ्याची चिंता आणखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील 10 दिवसात पाऊस होणार नसल्याचा अंदाच हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ही राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. हवामान खात्याच्या कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (Maharashtra will not get rain till July 9 Meteorological Department forecast) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 ते 9 जुलै नंतर पावसाचं पुनरागमन होण्याची  शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.  


जून महिन्यातील पावसाची जिल्हानिहाय स्थिती


दरम्यान, राज्यातील विविध जिल्ह्यात जून महिन्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस पडला. ही आकडेवारी आपण टक्केवारीत पाहुयात. राज्यातील  अकोला, धुळे आणि नंदूरबार या 3 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. 


सरासरीपेक्षा कमी पावसाचे जिल्हे


अकोला -51 टक्के
धुळे  -38 टक्के
नंदुरबार -30 टक्के


11 जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस


नाशिक, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,  हिंगोली, बुलडाणा, गोंदिया आणि गडचिरोली या  11 जिल्ह्यांमध्ये  सरासरी पाऊस झाला आहे. 


6 जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्य


तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर,  सातारा, कोल्हापूर, जालना आणि परभणी  या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 60 ते 80 टक्के  जास्त पाऊस झाला आहे. तर 16 जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा २० ते 60 टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे.


संबंधित बातम्या :