Nashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई
Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.
Nashik Income Tax Raid news In Marathi: आयकर विभागाच्या रडारवर पुन्हा एकदा नाशिक आले असून आज या विभागाच्या पथकांनी बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाचे छापे घातल्याचे वृत्त आहे. आज पहाटेपासून नाशिक शहरात आयकर विभागांना छापा-सत्र सुरू केले आहे. राज्यातील आयकर विभागाचे एकूण 120 अधिकारी 70 विविध वाहनांमध्ये नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
अनेक बांधकाम व्यावसायिकांवर छापे पडले असून मोठा आयकर बुडवल्याचा संशयावरून हे छापे करण्यात आले आहे कुणालाही कळू नये म्हणून मुंबई विभागाच्या आयकर विभागाने औरंगाबाद मध्ये जाऊन नंतर नाशिकमध्ये येऊन या कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईसाठी 150 अधिकाऱ्यांची मोठी फौज नाशिकमध्ये दाखल झाली आहे. तसेच मुंबईचे दीडशे आयकर अधिकारी नाशिकमध्ये पोहचले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिक शहरातील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगले कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स या ठिकणी आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित कार्यालयात तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वी यातील तिघांवर जीएसटी विभागाने कारवाई केली होती. यामध्ये अनेक राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि खासदारांचे बड्या रिअल इस्टेट कंपन्या आणि कंत्राटदारांशी व्यावसायिक संबंध असल्याची माहिती आहे. विविध कंपन्या या सरकारी कंत्राटदार असल्याचीही चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर आयकर विभागाने पुन्हा एकदा नाशिक शहरात छापे टाकले आहेत. मुंबईतील सुमारे 150 अधिकारी 70 वाहनांतून आज सकाळी नाशिकमध्ये दाखल झाले. हे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतरही औरंगाबाद आणि इतर ठिकाणी छापेमारी झाल्याची प्रथम माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात छापा नाशिक शहरातच झाला. आयकर विभागाने आज सकाळी केलेल्या छापेमारीत सरकारी ठेकेदार असून, त्यांच्याशी निगडित काही चार्टर्ड अकाउंटंट्सच्या कार्यालय व निवासस्थान यांच्यावरही छापेमारी करण्यात आल्याते सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि जिल्हा परिषदेशी निगडित असलेल्या काही कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. हे दोन्ही कंत्राटदार नाशिकमध्ये वास्तव्यास असले तरी ते सिन्नर तालुक्याशी निगडित आहेत. तर एक ठेकेदार मुंबई नाका येथील असून, त्याने महाराष्ट्र पोलीस अकादमीसह काही शासकीय इमारतींच्या बांधकामात सहभाग घेतला आहे, तर दुसरा कंत्राटदार हा व्यावसायिक भागीदार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यापूर्वी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.