Maharashtras first Udyog Ratna Award: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिलीय. महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी 2000 मध्ये भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं त्यांना व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.  


रतन टाटांचे मोठे योगदान


टाटा ग्रुप भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. देशाला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. तसेच टाटा समूहाची मोठी भरभराट रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवली. सर्वसामान्य जनतेला टाटा समूहाने बनविलेल्या वस्तूंवर विश्वास असतो. टाटा कॅंसर रुग्णालयात लाखो रुग्ण उपचार घेत असतात. आजही रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठीही प्रसिद्ध आहेत.


महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्याचा निर्णय झाला. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. याशिवाय महिला तसेच मराठी उदयोजक आणि अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.