Maharashtra Weather Forecast by IMD: राज्याच्या अनेक भागात पावसाने (Maharastra Rain) तांडव घातल्याचं दिसून येतंय. खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी, तलाव सीमा ओलांडून वाहत असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर पावसाची शक्यता असल्याने तणनाशक वापरणं तसंच खतांचा वापर ही कामं पुढं ढकलावी लागत आहे, अशातच आता पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांना हवामान खात्याकडून (IMD) अलर्ट जारी करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचे कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भ काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. विस्तारित श्रेणीनुसार, हवामान अंदाज (Extended Range Weather Forecast) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील 2 आठवडे (14 ते 27 जुलै दरम्यान) महाराष्ट्रासह खानदेश भागात नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.


जीएफएस (GFS Model) मॉडेलनुसार येत्या 4 ते 5 दिवसात कोकणात जोरदार तर राज्याच्या आतल्या भागात मध्यम पावसांची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवस विदर्भातही पाऊस पडेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.



जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) -


रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया.


विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) -


धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.


दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून पाऊस पडत आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरकारने सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.