Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार काहीसे बॅकफूटवर आले होते..  मात्र विधान परिषदेच्या निकालानंतर अजित पवार यांचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळतंय. दादांनी आता मिशन विधानसभा हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना विधानसभेसाठीचा मास्टर प्लानच सांगितला. 


हा मास्टरप्लॅन नेमका काय आहे? त्यावर एक नजर टाकुया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेला भाजपनं सर्व्हे केले होते. विधानसभेसाठी सर्व 288 जागांचा सर्व्हे करणार आहेत. महायुतीतील तिन्ही पक्ष आपापले सर्व्हे करणार असल्याची माहिती आहे. तिन्ही पक्षांचे सर्व्हे समोर ठेवून निर्णय घेणार आहेत. दोन सर्व्हेत ज्या पक्षाच्या उमेदवाराला जास्त पसंती त्या पक्षाला ती जागा असं समीकरण असणार आहे. अजित पवार 2019 ला जिंकलेल्या 54 जागांवर दावा करतील. तर या जागांमध्ये नवाब मलिकांचा समावेश असणार आहे. आमचे उमेदवार पुढे असतील तिथं दावा करणार. तसेच आमदार परत गेले तर नव्या लोकांना संधी देऊ, असा निश्चय दादांनी केलाय.


तर कोणती जागा कुणाला पेक्षा जागा जिंकणं महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी अजितदादांच्या या प्लॅन वरून जोरदार टोला लगावलाय.


दरम्यान, जागांवर दावा करणं आणि दावा केलेल्या जागा पदरात पाडून घेणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे. लोकसभेला भाजपने सर्व्हेचा दाखला देत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या अनेकांची तिकीटं कापली होती. त्यामुळे अजितदादा आपल्याच मित्रपक्षांना आता सर्व्हेला सर्व्हेनं उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.