Maharastra Politics : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद आता टीपेला पोहचलाय. एकमेकांना कोंडीत पकडायची संधी ना शरद पवार (Sharad Pawar) गट सोडतो ना अजित पवार गट. आता शरद पवारांना काऊंटर करण्यासाठी अजित पवार गटानं वेगळीच रणनीती आखलीय. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा असेल वा शरद पवारांची विजयादशमी सभा.. शरद पवार गट थेट लोकांमध्ये जातोय, जनतेशी संवाद साधतोय. आता शरद पवार गटाच्या याच रणनीतीला काऊंटर करण्याची रणनीती अजित पवार (Ajit Pawar) गटानं आखलीय. शरद पवारांची कोंडी करण्यासाठी अजित पवार गटानं काय रणनीती आखलीय, पाहुयात..


दादांची रणनीती काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या ज्या ठिकाणी शरद पवारांची सभा, त्या त्या ठिकाणी अजित पवार गट सभा घेणार आहे. केवळ उत्तर सभा घेण्यापेक्षा पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल. तळागाळातील मतदार पक्षासोबत जोडण्यासोबत तालुका-विभागीय मेळावे घेणे, जिल्हास्तरीय बैठकांचं आयोजन करण्यावर भर देण्यत येणार आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्या भागातील प्रश्न सोडवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 9 मंत्र्यांवर राज्यातील विविध विभाग आणि जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पवारांच्या दसरा मेळाव्यानंतर रणनीतीत बदल करण्यात येईल. दरम्यान सभा आणि निवडणूक यांचा दुरान्वये संबंध नाही, असं सुनील तटकरेंनी म्हटलंय.


आणखी वाचा - 'ललित पाटील प्रकरणात दादा भुसेंचा हात', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसे म्हणतात, 'माफी मागा नाहीतर...'


राष्ट्रवादी कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात असताना आता अजित पवार गटानं दुहेरी रणनीती आखलीय. शरद पवार, सुप्रिय सुळे आणि रोहित पवार थेट लोकांमध्ये फिरतायत. शरद पवार गटाच्या याच रणनीतीला काऊंटर करण्यासाठी अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी थेट जनतेत जाण्याचा निर्णय घेतलाय. सोबत सभांचं आयोजनही आहे. राष्ट्रवादीतला सामना नजीकच्या काळात तीव्र होताना दिसेल. त्यामुळे आता जनता कोणाला कौल देणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.