Eknath Shinde On Raj Thackeray's allegation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राज आणि भूजबळांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावर झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत केलंलं हे वक्तव्य राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भूमिकेला छेद देणारं आहे. राज यांनी कल्याणच्या सभेतून उद्धव ठाकरेंवर टीका करताना भूजबळांवरही (Chhagan Bhujbal) निशाणा साधला होता. ज्या भूजबळांना बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले होते, अशी टीका राज यांनी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी भूजबळांवर टीकास्र डागल्यानंतर भूजबळ यांनीही राज यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. तुम्ही तर रक्ताचे होतात. तुम्ही का बाळासाहेबांशी असे वागलात? असा सवाल झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भूजबळ यांनी राज ठाकरेंना विचारलाय. तर झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) महत्त्वाचं विधान केलं. 


बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, त्यांनी भुजबळांना माफ केलं होतं, असं म्हणत भुजबळांवरुन राज ठाकरेंच्या भूमिकेला मुख्यमंत्री शिंदेंनी छेद दिलाय. ज्या भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावरुन भुजबळही राज ठाकरेंवर बरसले होते. भुजबळ-राज वादावर मुख्यमंत्री शिंदेंनी सूचक विधान केलंय.


दरम्यान, उद्धव ठाकरेंवर तोफ डागताना राज ठाकरेंनी भुजबळांना मध्ये आणलं. मात्र आपण महायुतीला पाठिंबा दिलाय आणि भुजबळ हे महायुतीमध्येच आहेत हे बहुदा राज ठाकरे विसरले असावते. राज ठाकरे आणि छगन भूजबळ हे महायुतीमधील दोन दिग्गज नेते.. त्यांच्यातील हे आरोप प्रत्यारोप महायुतीसाठी परवडणारे नक्कीच नाहीत. त्यामुळे हा सिलसिला इथेच शमतो की आगामी काळात आरोपांची खपली निघते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.