विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना सल्ला देत म्हणाले...
Shiv Sena MLA Disqualifiation Result : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Sharad Pawar On Rahul Narvekar verdict : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. तसेच शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. अशातच राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
सत्ताधाऱ्यांना निकालाबाबत आधीच माहिती होती. त्यांनी आधीच यावर भाष्य केले होते. उद्धव ठाकरेंना आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिलं. सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन डावलण्यात आल्या. सत्ताधाऱ्यांना निकालाची खात्री होती. व्हिप देण्याचा निर्णय हा पक्षसंघटनेचा असतो. हा राजकीय न्याय निवाडा आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
निवडणुका जवळ असल्याने सत्तेचा कसा वापर होतो, याची प्रचिती आज आली. सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंना न्याय मिळेल, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेलं. अध्यक्षांच्या या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंना मदत होईल, असंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, घराणेशाही मोडीत निघाली. विधानसभा सदस्यांना मनमानीविरुद्द आवाज उठवण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. आदित्य ठाकरे यांना यावर व्यक्त होताना निर्लज्ज म्हणत संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीची इतकी निर्लज्ज हत्या यापेक्षा ठरु शकत नाही. हे देशासाठी मोठे संकेत आहे. घाणेरडं, खोक्याचं राजकारण वैध ठरवलं जात आहे. भाजपाला देशाचं संविधान बदलायचं आहे असं आदित्य म्हणाले आहेत.