Ashok Chavan Resign :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी आमदार काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्हिडीओ शेअर करत रवी राणा यांचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर? 


जे स्वतः सातत्याने पक्ष बदलत असतात. ज्यांना  तत्व, मूल्य याच्याशी काही घेणंदेणं नाही. जे स्वतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर निवडून आले आणि नंतर पक्ष बदलून गेले अशा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आधी आपण काय आहोत?  याकडे पहावं, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांना टोला लगावला आहे. अशांनी आमच्यावर बोलण्याची गरज नाही. कारण आम्ही सर्वधर्मसमभाव या विचारांशी प्रामाणिक आहोत. त्यासाठी आम्ही आमचं आयुष्य अर्पण करायला तयार आहोत ,आम्ही कुठेही जात नाही आणि जाणार नाही, असं स्पष्टीकरण यशोमती ठाकूर यांनी दिलं आहे.


पाहा Video



अशोक चव्हाण यांच्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा राजीनामा देतील. दरम्यान, काँग्रेस नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा रवी राणा यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांचे नाव न घेता आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण काँग्रेसला मोठा धक्का देणार का? असा सवाल विचारला जातोय.


आणखी वाचा - Ashok Chavan : 'मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष...', अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले...


दरम्यान, अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षात प्रवेश करणार? यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही. मात्र, अशोक चव्हाण जाता जाता 17 आमदार घेऊन जाणार असल्याची चर्चा होत आहे. अशातच अशोक चव्हाण यांच्यासोबत नेते जातील पण आमदार जाणार नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.