मोदी सरकाराचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील जनतेला 5 लाखाचं आरोग्य कवच
दारिद्र्य रेषेखालील जनतेला महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळतो. आता मात्र, या योजनेचा सर्व आर्थिक गटातील जनेतेला लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतगर्ता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच मिळणार आहे. दारिद्र्यरेषेखालील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी युरु करण्यात आलेल्या या योजनेचा आता सर्व आर्थिक गटातील लोकांना लाभ घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना केंद्र सरकरच्या जन आरोग्य योजनेत विलीन करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आता आयुष्मान भारत विमा योजनेशी जोडली जाणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना योजनेचा निधी 1.5 लाखांवरून 5 लाख करण्यात आला आहे.
54 लाख रुग्णांना मिळणार लाभ
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना 2 जुलै 2012 रोजी लाँच करण्यात आली. या योजनेअंतर्गत 54 लाख रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी 10,550 कोटींचा खर्च सरकारतर्फे करण्यात आला आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले आयुष्मान भारत विमा योजनेशी जोडली जाणार आहे. यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचाराचा लाभ घेतलेल्या 54 लाख रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकार ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व आवश्यक वैद्यकीय उपकरणांसह 50 क्रिटिकल केअर युनिट(ICU) सुरु करण्याचा विचार करत आहे.
सहा महिन्यांत सहा कोटी लोकांना हेल्थ कार्ड देणार
आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि सर्वासामान्यांना परवडणारी बनवण्याचे केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दोन्ही योजना एकत्र केल्याने संपूर्ण भारतातील 60 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. 12 कोटी लोकांना या महाराष्ट्रात संयुक्त योजनेत समाविष्ट करण्याचे केंद्र सरकाराचे टार्गेट आहे. येत्या सहा महिन्यांत सहा कोटी लोकांना हेल्थ कार्ड देण्याचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आरोग्य पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्राने 3,000 कोटी मंजूर केले आहेत.
महाराष्ट्रात स्वस्त औषध केंद्रांची संख्या वाढवणार
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनऔषधी केंद्र सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यभरात 600 ते हजार केंद्र सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या केंद्रामध्ये रुग्णांना स्वस्त दरात औषध उपब्धल. मधुमेह, कर्करोग आणि उच्चरक्तदाब यांसारख्या आजरांच्या रुग्णसंख्येत झापाट्याने वाढ होत आहे. या आजारांचा दीर्घकालीन उपचार खर्च लक्षात घेता रुग्णांना स्वस्त दरात औषधे खरेदी करण्यास मदत होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी योजनेअंतर्गत रुग्णालयांचा विस्तार केला जाईल असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.