मुंबई : सीएए आणि एनआरसीचा विरोध करण्यासाठी महाविकासआघाडी २४ जानेवारीला मोर्चा काढणार आहे. दादरच्या बाबू गेनू चौकातून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. यासाठी सर्वपक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार - कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी ८ जानेवारील देशव्यापी संप पुकारला होता. त्याचा बँक, वाहतूक आणि अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंटक, आयटक, एचएमएस, सिटू यांच्यासह विविध संघटनांनी हा संप पुकारला होता. या संपामध्ये राज्य सरकारी रुगणालयांमधले तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारीदेखील सहभागी होते. 


केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात पुकारलेल्या भारत बंदचा मुंबईवर फारसा परिणाम झालेला नाही. रस्ते आणि रेल्वे वाहतूक, शाळा, कॉलेज, मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली लोकल आणि बेस्ट सेवा सुरळीत होती.  तर रस्त्यावर बेस्ट, रिक्षा, टॅक्सी सुरळीत सुरू होती. त्यामुळे आता २४ जानेवारीच्या संपाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.