मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसतं नाहीयत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची यावरी भूमिका अद्याप स्पष्ट होत नाहीय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी याविषयावर संवाद साधला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वबाजुने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भातील पत्र पाठविले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या सहीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक लवकर घ्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.


२४ एप्रिल रोजी विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या. त्याची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. 



दरम्यान एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांची राज्यपालांशी भेट संपली असून यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा अशी विनंती करण्यासाठी भेट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सकाळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. तर संध्याकाळी मंत्री एकनाथ शिंदे याच्यासह मिलिंद नार्वेकर यांनी घेतली दुसर्‍यांदा भेट घेतली.