Girish Mahajan : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत (Bmc Election 2022) महायुती होण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित मनसेच्या दीपोत्सवात (Mns) या महायुतीची पहिली झलक पाहायला मिळाली. मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले 3 बडे नेते आमने सामने होते. शिवाजी पार्कवर मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र दिसले. त्यावर आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरीश महाजन यांनी सेना (शिंदे गट)-भाजप-मनसे महायुतीचे संकेत दिले आहेत. दिवाळी निमित्त एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले होते. याकडे राजकारण म्हणून बघण्याचं कारण नाही, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. त्यानंतर पुढच्याच वाक्यात त्यांनी सुचक संकेत दिले. पण राजकारणात काहीही अशक्य नसतं, असंही गिरीश महाजन यावेळी म्हणाले आहेत.


सध्यातरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहे. मनसेबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, असंही महाजन यावेळी म्हणाले आहेत. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात राजकारणात मोठी उलटापालट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


आणखी वाचा - राज ठाकरेंचा Swag च वेगळा, एकच मारला पण सॉलिड मारला


दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेत भाजपचीच पुन्हा सत्ता येणार, असा पुनरूच्चार गिरीश महाजन यांनी केलाय. शिवसेनेत कोण येईल, कोण जाईल, हे सांगता येत नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा ठाकरे गटाला डिवचलं आहे.