`माझ्याशी पंगा`, ऑनलाईन नाटकाचे लॉकडाऊनमध्ये १०० प्रयोग
लॉकडाऊन सुरू असतानाही एका नाटकाचे ऑनलाईन चक्क शंभर प्रयोग झालेत.
किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : लॉकडाऊन सुरू असतानाही एका नाटकाचे ऑनलाईन चक्क शंभर प्रयोग झालेत. छोट्या दोस्तांनी लॉकडाऊनमधली त्यांची सुट्टी सत्कारणी लावली. माझ्याशी पंगा या बालकलाकारांच्या नाटकाचे तब्बल १०० प्रयोग पार पडलेत. रंगकर्मी देवदत्त पाठक यांनी यासाठी मोठा पुढाकार घेतलाय. पालकांच्या मदतीने त्यांनी मुलांना नाटकाचे धडे दिले होते. बघता बघता या नाटकाचे ऑनलाईन शंभर प्रयोग झाले.
समोर प्रेक्षक नसतानाही या बालकलाकारांनी तीच ऊर्जा आणि तोच उत्साह नाटकात कायम ठेवला. कोरोनाच्या काळात माझ्याशी पंगा नाटकाचा हा विक्रम एक मस्त प्रेरणा आहे.