पुण्यात ATS ची मोठी कारवाई, दोघे जण ताब्यात; लॅपटॉपमध्ये सापडली संशयास्पद माहिती
पुणे पोलीस आणि ATS ने मोठी कारवाई केली आहे. देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pune Crime News : पुणे पोलीस आणि ATS ने मोठी कारवाई केली आहे. देशविरोधी कृत्य केल्याच्या संशयावरून पुण्याच्या कोथरूडमधून 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या लॅपटॉपमध्ये गोपनीय संशयास्पद माहिती आढळली आहे. हे दोघेही कोंढव्यातील राहणारे आहेत. त्यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. घरात तपासणी केली असता पोलिसांनी लॅपटॉप जप्त केला आहे. दिवसभर या दोघा तरुणांची पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. याप्रकरणातील एक आरोपी फरार असल्याचं समजते.
बांगलादेशींनी रचला होता मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट
पुण्यातून पाच संशयित बांगलादेशींनी अटक करण्यात आली होती. मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचं उघड झाले होते. महाराष्ट्र एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्सारउल बांगला टीम म्हणजेच ए बी टी या संघटनेनं महाराष्ट्रात तीन शहरात जाळं पसरवलं होतं. ही दहशतवादी संघटनेनं पुणे, महाड आणि अंबरनाथमध्ये पाळमुळं रोवली असल्याचं आता पुढे आले होते. अन्सार उल बांगला टीम अर्थात ABT या दहशतवादी संघटनेवर 2016 मध्ये बांगलादेशमध्ये बंदी घालण्यात आलीय. ही संघटना अल कायदाशी संलग्न असून कोलकाता, मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. पण यापैकी कुठलीही योजना पूर्ण होण्याआधीच एटीएसनं पाच जणांना अटक करून कट उधळून लावला होता.