Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल पहायला मिळाल आहे. महाविकास आघाडीला अक्षरशः लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. निकालानंतर आता महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. पुढच्या 36 तासांत कोणत्याही क्षणी  नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. या अनुषंगाने हालचाली होत असल्याचे दिसत आहे. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील 2 मंदिर भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या 36 तासांत कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो.  निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली. शपथविधीत मुख्यमंत्री, उपमुखयमंत्री यांचा समावेश असून, काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते. निवडणूक आयोगाचे अधिका-यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. 


निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना दिली जाईल.  निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवण्यात येईल. त्यानंतर राज्यपालांकडून नवी 15वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, अद्याप मुख्यमंत्री कोण असेल याबाबत निर्णय झालेला नाही. महायुतीमध्ये बैठकांचा जोर वाढला आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत देखील कोणताच निर्णय झालेला नाही. 


असा लागला महाराष्ट्राचा निकाल


विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकत आपण मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 48 जागांवर समाधान मानावं लागलं. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला वाट्याला 17 जागा आल्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा जिंकता आल्या. तर एकदा हाती सत्ता द्या असं आवाहन करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. तर सत्तेत सहभागी होऊ असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांचा एकही उमदेवार जिंकून आणता आला नाही.