जयेश जागड, झी मीडिया, अकोला: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सध्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सुरू आहे. 'बाहुबली' नावाचा रेडा या कृषी प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. या रेड्याला पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी करताना दिसत आहेत. या रेड्याचं चालणं, दिसणं आणि ऐट याचीच चर्चा अनेकांच्या तोंडी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा रेडा शेगाव येथील प्रवीण बनोले यांच्या मालकीचा आहे. गुजरातमध्ये आढळणाऱ्या गिर जाफ्राबादी जातीचा हा रेडा त्यांनी राजस्थानातून आठ महिन्याचा असताना विकत घेतला होता. सध्या बाहुबली तीन वर्षांचा आहे. बाहुबलीची देखभाल करण्यासाठी दररोज तीन हजार रुपये खर्च होतात. बाहुबलीचे वजन दोन हजार किलो आहे. आगामी काळात या रेड्याच्या वीर्य विक्रीतून उत्पन्न कमावण्याचा प्रवीण बनोले यांचा मानस आहे.


कृषी प्रदर्शनात आलेले शेतकरी आणि आगंतूक प्रेक्षकांना या रेड्याने चांगलीच भुरळ पाडली आहे. बाहुबलीला पाहायला आलेले लोक त्याला आपल्या कॅमेर्‍यात क्लिक करतात अन सेल्फीही काढत आहेत.