नाशिक : मालेगांवमध्ये कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. कोरोनाच वाढता फैलावर आणि लोकांचे बाहेर फिरणे यामुळे शहरात पुन्हा संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व बॅंका १९ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रांत विजयानंद शर्मा यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तसेच शहरातील चार पेट्रोलपंपांना इंधन विक्रीची परवानगी देण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनांना इंधन दिले जाणार आहे. तसेच राज्य राखीव तुकड्या आणि अतिरिक्त पोलीस कुमक  मालेगावात मागविण्यात आली आहे. संचारबंदी काळात कोणीही नागरिक रस्त्यावर दिसणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.



कोरोना बाधितांची संख्या गेल्या आठवड्याभरात वेगाने वाढत असताना मालेगावकर मात्र अजूनही सोशल डिस्टन्ससिंग बाबतीत गंभीर नाहीत. शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर मोठ्या रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे केवळ शासकीय वाहनांना आता इंधन मिळणार आहे.


गेल्या ४८ तासात बाजारामध्ये भाजीपाला खरेदी करण्यास प्रचंड गर्दी उसळलयाचे चित्र सोयगाव भागात पाहायला मिळाले होते. हा बाजार हटवण्यासाठी एसआरपीला पाचारण करण्यात आले. थोडी नागरिकांची पळापळ झाली तरीही बाजारात सुस्त माहोल दिसून येत होता. आता मालेगाव लवकरच रेड झोन असल्याने येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.