मालेगाव : मालेगाव शहरातील चार शाळकरी मुलं एकाच वेळी बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नववीच्या वर्गात शिकणारी ही मुल असून दुपारी शाळा सुटल्या नंतर ही क्लासला जातो असे सांगून घरातून निघाले,मात्र संध्याकाळ पर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला.


शोध सुरू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री उशिरा पर्यंत ही मुलं सापडली नसल्याने अखेर कँम्प पोलिसात हरवल्याची तक्रार करण्यात आली.


धुव्र शिरोडे, साई घोरपडे, प्रेम बोरसे, आकाश सोनवणे अशी त्यांची नावे असून ते केबीएच आणि काकाणी विद्यालयात शिकत होती. पोलिस या मुलांचा सर्वत्र शोध घेत आहे.