पुणे: माळशेज घाटात आज (मंगळवार, २१ ऑगस्ट) पहाटे दरड कोसळली. त्यामुळे घाटातील वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. सुरूवातीचा काही काळ अडचणीतून मार्ग काढत सुरू असलेली वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे थांबविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरड कोसळल्यामुळे मार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिग साचला आहे. महामार्ग अधिकारी  कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी , पोलीस हे घटनास्थळी पोहचले दरड हटविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, घाटातील धुके, वारा आणि ढगाळ वातावरणामुळे कमी प्रकाश असल्याने दरड हटविण्याच्या कार्यात अडथळा येत आहे.


दरम्यान, दरड कोसळून मार्गावर साचलेले दगड, माती हटवून मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येईल अशी माहिती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.