पालघरमध्ये रुग्णवाहिका उपलबध न झाल्याने एकाचा मृत्यू
जवळपासच्या सहा ते सात रुगवाहिक नादुरुस्त
पालघर : पालघरमधील डाहे गावातील रमेश गवळी या व्यक्तिचा रुग्णवाहिका सेवा उपलबध न झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. सर्पदंशनंतर नातेवाईकांनी 108 क्रमांकावर संपर्क साधला असता या भागातील जवळपासच्या सहा ते सात रुगवाहिक नादुरुस्त असल्यानं उपलब्ध होऊ शकत नसल्याचं सांगण्यात आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
शेतात काम करत असताना रमेश गवळी यांना सर्प दंश झाल्याने तातडीने वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारांसाठी ठाणे येथे पाठविण्यासाठी नातेवाईकांना डॉक्टराणी सांगितले होते. पण दुर्दैवाने वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.