नवी मुंबईत आंबा दाखल, पेटीला दीड हजारांचा भाव
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरु झाली आहे. रोज ७०० ते ८०० पेट्या दाखल होत असून, एक डझन आंबा हा दीड हजार ते हजार रुपयाने विकला जात आहे.
नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरु झाली आहे. रोज ७०० ते ८०० पेट्या दाखल होत असून, एक डझन आंबा हा दीड हजार ते हजार रुपयाने विकला जात आहे.
द्राक्ष ,स्ट्रॉबेरी , चिकूबरोबर आंबा देखील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागला आहे, मागीलवर्षा पेक्षा यावर्षी आंब्याची आवक फेब्रुवारी महिन्यात कमी झाली आहे. मागील वर्षी कर्नाटक मधील हापूस दाखल झाला होता. पण यावर्षी अवकाळी पावसाने कर्नाटकचा आंबा आला नाही. सध्या रत्नागिरी आणि देवगडचा आंबा दाखल झालाय.
२६ फेब्रुवारीला २२०० पेट्या आल्या होत्या. येणारा आंबा हा तात्काळ विकला जात असून, एक डझन आंबा हजार रुपयांपासून, दोन हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. पाच डझन आंबा पेट्याची सहा ते सात हजार रुपये यांना विकला जात आहे.