Manoj Jarange Maratha Reservation: आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याने उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जाहीर केलं आहे. मात्र त्यांनी आंदोलन स्थगित करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आंतरवाली सराटी येथे गेल्यानंतर सर्वांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. ते म्हणाले की, "बोलून दाखवल्याप्रमाणे कायदा बनवून दाखला आहे. छगन भुजबळांचा कार्यक्रमच संपला आहे. पुढे जर अडचणी आल्या तर हा पठ्ठ्या लढणार आहे. मी पुन्हा आमरण उपोषण करेन. सगे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी, जीआरसाठी गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकेन".


"मी आंदोलन स्थगित केलेलं नाही. चुकून मी स्थगित शब्द वापरला होता. आंतरवालीत गेल्यानंतर तिथे सर्वांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू. सर्वांचा विचार करुन निर्णय घेतला जाईल," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.  बापाचं नाव बदलणार नाही म्हटलं होतं, ते करुन दाखवलं आहे. याचं श्रेय मराठा बांधवांना आहे असंही ते म्हणाले आहेत.