सावधान!!! मासे तुमच्या पोटात घालतायत प्लास्टिक
तुम्ही मासे खात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण मासे तुमच्या पोटात प्लास्टिक घालतायत...होय. आम्ही सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
मुंबई : तुम्ही मासे खात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण मासे तुमच्या पोटात प्लास्टिक घालतायत...होय. आम्ही सांगतोय त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
तुमच्या ताटातले हे मासे कितीही चमचमीत दिसत असले तरी ते तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात. कारण सात प्रसिद्ध माशांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण सापडले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्चच्या अहवालानुसार:
चेन्नईमधल्या मरिना बीचवरच्या माशांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण मिळाले आहेत.
या किना-यावरच्या ८० टक्के माशांमध्ये प्लास्टिक सापडले आहे.
खाल्ल्या जाणा-या सात प्रसिद्ध माशांमध्ये प्लास्टिक मिळालं आहे.
त्यामध्ये बांगडा, बोम्बिल, चेम्बाली, आरन्ना, बाराकुडा, चोर बोंबिल, मोरी, झिंगा या माशांचा समावेश आहे.
माशांच्या शरीरामध्ये तुकडे, कण आणि धाग्यांच्या रुपात प्लास्टिक सापडत आहे.
मासे हे लाल रंगांच्या वस्तूला त्यांचं अन्न समजतात, त्यामधूनच त्यांच्या पोटात प्लास्टिक जातं. मोठे मासे खाण्याआधी त्यांच्या पोटातलं प्लास्टिक काढणं शक्य आहे. पण लहान माशांच्या पोटातून प्लास्टिक काढणं शक्य नाही.
हे प्लास्टिक जास्त प्रमाणात पोटात गेलं तर कॅन्सर, अल्सर, अन्ननलिका खराब होणं किंवा एखादा अवयव निष्क्रीय होण्याची भीती असते.
त्यामुळे मासे खाताना जरा जपून. त्यांच्या शरीरात प्लास्टिकचे कण नाहीत ना, याची खात्री करा आणि मगच माशांवर ताव मारा.