पुणे : पुण्यात मराठा समाजाच आंदोलन संपल्याची घोषणा मराठा मोर्चा समन्वयकांनी केली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील आंदोलन संपल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.  नगर सस्ता आणि चांदणी चौकात तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. पुण्यात जिल्हाधिकाऱ्य़ाचं कार्यालय देखील फोडण्यात आलं.चांदणी चौक परिसरात पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला. चांदनी चौक परिसरात आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाली आहे. चांदणी चौक परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागतांना दिसत आहे. नांदेडच्या उमरी रेल्वे स्थानकात देखील तोडफोड झाली आहे. नाशिकमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दुकानांवर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली.


अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर


औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. 2 खासगी आणि 1 पोलिसांची गाडी पेटवण्यात आली आहे. अश्रुधुराच्या कांड्या देखील फोडल्या आहेत. पुण्यात देखील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.