जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील मंठा, बदनापूर, अंबड, घनसावंगी या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आलाय, या ठिकाणचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत, तसचं चारही तालुक्यात शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत, मंठा शहरात शालेय विद्यार्थ्यांनी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद देत रॅली काढून आरक्षणाची मागणी केली.  तसचं जिल्ह्यातील जाफ्राबाद, भोकरदन या तालुक्यांमध्येही बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.


जालना जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील मंठा,बदनापूर,अंबड,घनसावंगी या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. या ठिकाणचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून काल ही शहरं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याचं पालन करत आज सर्व व्यावसायिकांनी आपली दुकान बंद ठेऊन बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे.



शाळा आणि महाविद्यालये देखील बंद


दरम्यान या चारही तालुक्यात शाळा आणि महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली असून शाळा आणि महाविद्यालयांनी देखील बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे. मंठा शहरात शालेय विद्यार्थ्यांना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रॅली काढून आरक्षणाची मागणी केली.रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद,भोकरदन या तालुक्यांत देखील बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.