सकल मराठा क्रांती मोर्चाचं `मुंबई बंद`चं आंदोलन मागे
अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण
मुंबई : सकल मराठा क्रांती मोर्चाने मुंबई बंदचं आंदोलन मागे घेतलं आहे. मराठा मोर्चाकडून आंंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आंदोलकांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आलं आहे. ठाणे, मुंबईतही आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता बंद मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. शांतता राखण्याच्या मराठा समन्वयकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. (अपडेट 2.45 मिनिटांनी)
आज मराठा समाजाने दिलेल्या मुंबई बंदच्या हाकेनंतर सकाळपासून आंदोलनाला हळूहळू सुरुवात झाली. आंदोलक रस्त्यावर आले आणि अनेक ठिकाणी त्यांनी रास्तारोको केला. पण कंळबोलीमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलिसांच्या 3 गाड्य़ा जाळल्या. यावेळी पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक देखील झाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.
बातमीचा व्हिडिओ
नाशिक : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केली. काही आंदोलकांनी दुकानांवर दगडफेकही केली. आंदोलक हजारोंच्या संख्येनं असल्यानं पोलिसांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलक गटा गटात विविध परिसरात दुकानं बंद करण्यासाठी पांगले आणि आक्रमक झाले. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. (अपडेट 2.30 मिनिटांनी)
मानखूर्दमध्ये मोहिते पाटील नगर येथे आंदोलकांनी बसमध्ये पेट्रोलच्या बाटल्या टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिग्रेडला बोलवून बसमधील आग विझवण्यात आली आहे. ही कुर्ला बस आगाराची आहे.
नवी मुंबई : कळंबोली येथे पोलिसांचा फोजफाटा वाढवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणखी पोलिसांची कुमक मागवली.
नवी मुंबई : मराठा आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण लागलं आहे. कळंबोली येथे पोलिसांना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची गाडी पेटवली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला आहे.
- दादरच्या प्लाझा सिनेमासमोरही मराठा आंदोलकांनी रस्तारोको करून सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. प्लाझाच्या चौकात पूर्व उपनगरं आणि पश्चिम उपनगरातून वाहनांची मोठी गर्दी होते. आज आंदोलनामुळे बराच वेळ प्रवाशांचा खोळंबा झाला.
- मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोगेश्वरी परिसरात काही काळासाठी रेल्वे रोखून धरली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रास्तोरोको केला तसेच मार्केटमधील दुकाने बंद केली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रिक्षा वाहतूकही बंद केली.
12.10 रायगड - खोपोलीमध्ये आंदोलकांकडून चक्काजाम. रस्त्यावर शेकडो आंदोलकांचं ठिय्या आंदोलन.
12.00 ठाण्यातील जांभळी नाका परिसरात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनचे पोस्टर फाडले. पोस्टरवर चिखल फेक. आंदोलकांची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी.
11.45 नवी मुंबईत सायन - पनवेल महामार्ग वाशी आणि कलंबोली येथे अडवला. मराठा आंदोलनकर्त्यांचा रास्तारोको
11.35 मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुंबई सेंट्रल,परळ आणि कुर्ला एसटी डेपो आज बंद
11.30 शिवाजी चौक, चेंबूर येथे मराठा आंदोलकांचा रास्तारोको. मुंबईत येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक काहीकाळ ठप्प. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत. मराठा कार्यकर्त्यांचे आंदोलन मात्र सुरू
11.30 दादर पूर्व रेल्वे स्थानक येथे मराठा क्रांती मोर्चाची सरकार विरोधात निदर्शने. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी. पुढचं आंदोलन हे अधिक तीव्र असेल असा सरकारला इशारा. समाजाचे प्रश्न उपस्थित न करणाऱ्या मराठा समाजाच्या आमदारांविरोधात ही आंदोलन करणार असल्याची मराठा आंदोलकांचा इशारा
11.20 नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्तारोको. पिंपळगाव बसवंत जवळील कोकणगाव फाट्यावर अर्धा तास रास्ता रोको. अचानक रस्ता रोको झाल्याने पोलिसांची धावपळ
11 :15 उल्हासनगरमध्ये रिक्षा बंद. मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला रिक्षा चालक मालक संघटनेचा पाठिंबा. शहरातील रिक्षा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहणार.
11:00 घाटकोपरमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मुंडन करून सरकारचा केला निषेध
10:55 वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा. कंदिवली येथे मुबंई आणि ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद.
10:54 अकोल्यात मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद. शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा-कॉलेजेस पूर्णत: बंद. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त.
10:50 मुलुंड इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. मुंबई आणि ठाणे दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प.
10: 45 जागृती नगर मेट्रो स्टेशन येथे मेट्रो बंद करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना मेट्रो स्टेशनच्या बाहेर पोलिसांनी रोखले.
10:30 दहिसरमध्ये 5 ते 6 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
10.26 मराठा बंद दरम्यान मुंबई आणि नवी मुंबईत बेस्टच्या ९ बसेस आतापर्यंत आंदोलकांनी फोडल्या आहेत
10.27 नवी मुंबईतील कोपरखैरणेत २, चांदीवलीत २, कुर्ला बैल बाजार १, टेंभीपाडा भांडुप १, अंधेरीत १, सफेद पूल, साकीनाका १, हनुमान नगर कांदीवली इथं १ बस फोडल्या गेल्यात
10.15 ठाणे : मराठा आंदोलकांनी ठाण्यात लोकल अडवल्या... मुंबईकडे येणारी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न
10:14 मुंबई : जोगेश्वरी पूर्व बाजुची अनेक दुकाने आणि स्टॉल्स बंद करण्यात आले
9:50 मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मनमाडहून सुटणाऱ्या बस बंद, प्रवाशांचे हाल.
9:47 सातारा- चिपळूण - विजापूर राज्य मार्गावर कराडजवळ ओगलेवाडी येथे टायर पेटवून मराठा समाजाचे आंदोलन. वाहतूक ठप्प
9:45 ठाण्यात आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. माजीवाडा पुलावर हे टायर जाळल्याने वाहतूक थांबली आहे.
9:40 मराठा आंदोलकांकडून ठाण्यात दुकानं बंद
9:33 मुलुंडच्या बाजारपेठा मराठा कार्यकर्त्यांनी केल्या बंद
9:25 जोगेश्वरीला चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल मराठा आंदोलकांनी रोखली.
9:10 मुलुंडमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांची घोषणाबाजी. बेस्ट बसेस अडवल्या
9:00 तीन हात नाका येथे मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन. पूर्व द्रुतगती महामार्ग रोखला. दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा
8:30 कल्याणमध्ये मराठा समाजाच्या वतीने शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा. उल्हानगर, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड या भागातील मराठा बांधव सहभागी होणार
8:10 उल्हासनगरमधील बाजारपेठा बंद राहणार, शहरातील सर्व व्यापारी संघटनांचा मराठा सकल क्रांती मोर्चाच्या बंदला पाठिंबा
8:00 पालघर- बोईसरमध्ये मराठा तरुणांनी रिक्षा आणि बस सेवा केल्या बंद
7:40 मराठा आंदोलकांकडून नाशिक बंदची हाक. बाजारपेठ, व्यापारी, दुकानदार यांना बंद ठेवण्याचे आवाहन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा. आमदार, खासदार यांच्या घरासमोर टाळ मृदंग आणि भजन करत आंदोलन करणार
7:00 रायगड - मराठा आरक्षणासाठी आज रायगड बंद, शाळा, दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. महाड येथे मराठा समाजाचा निघणार मोर्चा. आमदार भरत गोगावले कारणार नेतृत्व. बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन