Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये  (Rajguru Nagar) सभा झाली. जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली. बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिला. यामुळे स्टेजवर काही काळ गोंधळाचं वातावर निर्माण झालं होतं. मनोज जरांगेंच्या भाषणानंतर राजगुरूनगरच्या सभेत एका तरुणानं चांगलाच राडा केला. जरांगे भाषण आटोपून स्टेजवर उभे असताना अचानक हा मराठा तरुण स्टेजवर आला. त्यानं माइक हातात घेतला. मला बोलू द्या, नाहीतर आत्महत्या करेन, अशी धमकीच त्यानं माइकवरून दिली. तेव्हा पोलिसांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. जरांगेंनी या संतप्त तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो जरांगेंच्या पायाही पडला.. मात्र त्याचा हट्ट कायम होता. तो ऐकत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला उचलून स्टेजवरून नेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जरांगे-पाटील यांचा इशारा
आता मराठा आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. मराठ्यांना सरसरकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना न्याय देणार आहे..... मराठा आरक्षणासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारची धावपळ सुरू असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. मी एकदा शब्द दिला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा, असा खणखणीत इशारा जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगेंची पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी होती. जरांगे सभेला पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली. 



4 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात शांततेत आंदोलन करु.. त्यानंतर भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. मराठा आरक्षणासाठी सुनिल कावळेंनी दिलेलं बलिदान वाया जाऊ देणार नाही अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. पुण्यातल्या सभेआधी मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर जात शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. तसंच गडावरच्या शिवाई देवीची आरतीही जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. 


राजगुरुनगरमध्ये दाखल होण्याआधी जुन्नरच्या शिवाजी चौकात जरांगे पाटील यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं...यावेळी जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना पुढील आंदोलनाची स्ट्रॅटेजी सांगितलीय...प्रत्येक गावात सर्कलनुसार आंदोलनाची सुरूवात करा, मराठा बांधवाच्या घरी जाऊन आरक्षण कशासाठी हवं ते समजावून सांगा असं आवाहन जरांगेंनी केलंय..


पुण्यातील खेड आणि बारामतीत सभा झाल्यानंतर रात्री जरांगेंची साताऱ्यात सभा होणार आहे. साताऱ्यातील दहिवडीतील इंगळे मैदानात मराठा बांधवांनी या सभेची जय्यत तयारी केलीय...संध्याकाळी फलटणमध्ये एका चौकात तर त्यानंतर दहिवडी येथे रात्री इंगळे मैदानात मोठी सभा होणार आहे...या सभेला साताऱ्यासह सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने मराठा समाज येतील...मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंची आहे...