सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाचा इशारा दिलाय. आषाढी कार्तिकी निमित्त आयोजित शासकीय पुजा विठ्ठल मंदिरात करु देणार नाही, अशा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात पूजा करु देणार नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केलाय. मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांची राज्य बैठक आज पंढरपूरमध्ये पार पडली त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात उग्र होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवांनी राज्यभरात मोर्चे काढले. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आता  राज्यभरात आत्तापर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मूक मोर्चे निघाले. 


मात्र मराठ्यांचा मूक आक्रोश सरकारला समजलाच नाही. सरकारने आमच्या कोणत्याही मागणीची दखल घेतली नाही. उलट आम्हाला वाऱ्यावरच सोडले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या याच धोरणामुळे आता त्यांना आम्ही आषाढीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करु देणार नाही, असा निर्णय आम्ही घेतला आहे असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय राजाभाऊ गायकवाड यांनी सांगितले.