मुंबई : सोलापुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरुच आहे.. बार्शी माढा इथं एका आंदोलकानं रस्त्यारस्त्यात रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.. या आंदोलकाला पोलिसांनी अटक केली तर आरक्षणासाठी काही आंदोलकांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केलं. मराठा आरक्षणासाठी साता-यातील मराठा क्रांती मोर्चानं पाटण बंदचं आवाहन केलं. चिपळूण-विजापूर राज्य मार्ग आंदोलन कर्त्यानी अडवला. पाटण, मल्हारपेठ, नवारस्ता आणि ढेबेवाडी या ठिकाणीही कडकडीत बंद पाळण्यात आला. पुण्यात मराठा आंदोलनासाठी आदोलन सुरुच आहे.. आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील विश्रांतवाडी चौकात रास्ता रोको करण्यात आला.. या परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय.


परभणीत हवेत गोळीबार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलंचं पेटलंय. कुंभकर्ण टाकळीमध्ये पोलिसांना 5 राउंड हवेत गोळीबार करावा लागला. परभणी जिल्हा बंदची मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं हाक देण्यात आली होती. जिंतूर परभणी राज्यमहामार्गावर मोठंमोठी वृक्ष टाकून रास्तारोको सुरू होता. तीन तास होऊन ही आंदोलक रस्ता मोकळा करून द्यायला तयार नसल्यानं उपस्थित पोलिसांनी अधिकचं पोलीस घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल होताच आंदोलकांच्या वतीने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलीस जखमी झाले.  जमाव रस्त्यावरून परतवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून हवेत 5 फायर करण्यात आले. 


परभणी शहरातील आरआर पेट्रोल पंप आणि शिवाजी कॉलेज परिसरात मराठा समाजाच्या वतीने टायर जाळून रास्तारोको करण्यात आला होता. पोलिसांनी येथे मध्यस्थी केली असता पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली.