Manoj Jarange On Maratha Reservation : मनोज जरांगेंनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाबाबत दिलेली मुदत आज संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. विरोधकांचं कारण सरकारने आम्हाला सांगू नये विरोधकांचं कारण सांगून आरक्षण द्यायचं नाहीये का? असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला आहे. अजूनही वेळ गेलेला नाही, आमच्या हक्काचं आरक्षण द्या...मराठ्यांचा रोष सरकारला परवडणारा नाही...आरक्षण दिलं नाही तर 288 आमदार 100 टक्के पाडणार असा इशारा जरांगेंनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आयोजीत करण्यात आली होती. हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगेंचा अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 20 जुलैपासून  अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.  मेलो तरी मागे हटणार नाही. 20 तारखेला मराठ्यांच्या बैठकीची तारीखही सांगणार असल्याचे जरांगे म्हणाले. 


मराठ्यांना त्रास दिला तर मतदान करणारा आमदार पाडून टाकू


काल विधान परिषदेत निवडून आलेले सगळे बावळे आहेत. मराठा आमदारांनी त्यांना मतदान केलं आहे. आता जातीयवाद निवडून आलेल्या आमदारांनी करू नये असं मतदान केलेल्या आमदारांनी निवडून आलेल्या आमदारांना आणि ओबीसी नेत्यांना सांगावं. विधान परिषदेत निवडून आलेल्या आमदारांनी मराठ्यांना त्रास दिला तर मतदान करणारा आमदार पाडून टाकू असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 


सरकारने वेळ घेऊन एक महिना झाला आहे. आजची रात्र सरकारच्या हातात आहे. मराठा कुणबी एकच आहे मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्या. सातारा हैद्राबाद गॅझेट लागू करा अशी मागणी केली आहे. मराठ्यांच्या एकूण 9 मागण्या आहेत.  अशी गर्दी असल्यावर 288 उमेदवार पडल्याशिवाय राहत नाही. 


आजची रात्र तुमच्या हातात आहे ठरलेल्या 9 मागण्यांची अंमलबजावणी करा वारंवार मागण्या करायला लावू नका. आज पहिल्या टप्प्यातील समारोप आहे.  अजून 5 टप्पे राज्यात दौऱ्याचे बाकी आहेत.  पृथ्वीतलावावर मराठयांसारखी कट्टर जात नाही.  ही जात अन्न पाण्याचा विचार करत नाही.