Maratha Reservation Manoj Jarange Patil Daughter Speech: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मागील 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडवं म्हणून सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील सरकार निर्णय जारी केला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आज बुलढाण्यामध्ये मनोज जरांगेची मुलगी पल्लवी हिने जोरदार भाषण केलं. "आज 16 दिवस झाले आमचा बाप तिथे उपाशी आहे. पोटात अन्न आणि पाणीही नाही. केवळ समाजासाठी तो उपाशी आहे," असं म्हणत पल्लवीने आंदोलनांवर लाठी चार्ज का केला असा सवाल सरकारला विचारला आहे.


आम्ही काय पाप केलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बाप आमचा वाघ होता, वाघीण आमची आई होती. आज जिच्यामुळे मी इथं उभी आहे ती आमची आई जिजाऊ होती," असं म्हणत पल्लवीने आपल्या भाषणाला सुरुवात केली. "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंना त्रिवार वंदन करुन माझ्या भाषणाला सुरुवात करते. तुम्हाला सर्वांना माझा मानाचा जय शिवराय. अरे, हा मराठा समाज स्वत:च्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. का तर आरक्षण नाही. अरे आम्ही काय पाप केलं आहे की तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही?" असा प्रश्न पल्लवीने विचारला आहे.


नक्की वाचा >> तहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?


माझा बाप फक्त चार लेकरांचा बाप नाही


"आज 15 वर्ष झाली ओबीसी समाजाला आरक्षण आहे. मग आमच्या समाजाने काय पाप केलं म्हणून तुम्ही आम्हालाच आरक्षण देत नाही. आज माझा बाप अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसला आहे. आज 16 दिवस झाले आमचा बाप तिथे उपाशी आहे. पोटात अन्न आणि पाणीही नाही. केवळ समाजासाठी तो उपाशी आहे. का तर आरक्षण नाही. आम्ही मराठ्यात जन्म घेतला आम्ही काही पाप केलं आहे की गुन्हा केला आहे. आम्ही मराठ्यांमध्ये जन्म घेतला आहे तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. कारण आम्ही कुणबी मराठा आहोत. अरे, माझा बाप फक्त चार लेकरांचा बाप नाही. त्याआधी तो या सगळ्या लेकांचा बाप आहे. म्हणूनच तो या लेकरांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसला आहे," असं पल्लवीने म्हटलं आहे.  



लाठीचार्ज का केला?


"आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे तो आमचा हक्क आहे. आंदोलन शांतेत सुरु असताना तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करता कारण तुम्हाला आंदोलन उठवायचं आहे. अरे जमणार नाही. ते आंदोलन उठणार नाही. आंदोलन सहजासहजी पेटत नाही. आणि पेटला तर तो विजत नाही. अरे तुम्ही समजता कोण आमच्या मराठ्यांना. वाघाची जात आहे आणि वाघासारखीच आहे. फाडून काढू एका एकाला. आमच्या मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही. आम्ही मराठे साधे नाही ओ. आम्ही कुणबी मराठा आहोत. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनात तुम्ही छोटी लेकरं, तुम्ही माता माऊली बघत नाहीत येऊन लाठीचार्ज करता. का लाठीचार्ज करता? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय. आम्ही केवळ आमच्या हक्कासाठी लढतोय. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे," असं पल्लवीने आपल्या भाषणात म्हटलं.