सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : मराठा आरक्षणाचा (maratha reservation) मुद्दा राज्यात राजकारण पेटलं आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. दुसकीकडे मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाकेबंदी सुरु केली आहे. राज्यातील अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. कल मराठा समाजाकडून अजित पवार यांनी गावात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती. राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनाही मराठा समाजाकडून इशारा देण्यात आला आहे. माळेगावात अजित पवार (Ajit Pawar) यांनी येऊ नये असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. अशातच मंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या (Kartiki Puja) महापूजेसही मराठा समाजाने विरोध केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकी यात्रेत श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा सर्वसामान्य वारकऱ्यांच्या हस्ते करावी तसेच मंत्र्याच्या हस्ते महापूजा होऊ नये अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना पंढरपूर शहर बंदी करण्यात आली आहे. जर कोणीही बंदी झुगारून आले तर त्याला काळ फसले जाईल असा इशारा सकल मराठा समाजाने दिलेला आहे, त्यामुळे यंदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी कार्तिकीची शासकीय महापूजा टळणार का अशी शक्यता निर्माण झालेली आहे.


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे मराठा समाजाने राजकीय नेत्यांना राजकीय कार्यक्रमांना गावबंदी शहर बंदी केलेली आहे 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री करणार असून या पूजेला आता सकल मराठा समाजाने विरोध केलेला आहे. मराठा समाजातर्फे पंढरपूर शहरात बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी या महापुजेला येणे टाळावे आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सर्वसामान्य वारकऱ्याला या महापूजेची संधी द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केलेली आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा पेच पुन्हा वाढणार आहे.


आरक्षण मिळाले नाही तर हिवाळी अधिवेशन बंद पाडू - आमदार निलेश लंके


राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा कार्यकर्ते उपोषण करत आहेत. मावळ मधील कार्ला येथे देखील ग्रामस्थ मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी याठिकाणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भेट दिली. आमदार निलेश लंके आले असताना देखील मावळ वासीयांनी कोणत्याच प्रकारचा विरोध न करता त्यांना व्यासपीठावर बोलविण्यात आले. यावेळी आमदार लंके यांनी मराठा आरक्षण मिळाले नाही तर सर्व मराठा आमदार हिवाळी अधिवेशन बंद पाडू असा विश्वास उपोषणकर्त्याना दिला.