Lockdown | नागपुरात कडकडीत लॉकडाऊन जाहीर; नितिन राऊत यांनी केली घोषणा
नागपुरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागपूरात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूरचे पालकमंत्री नितिन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नागपूरातील लॉकडाऊनची घोषणा केली. 'नागपूर शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.'
नियम कडकडीत लागू
- कडक संचारबंदी लागू
- उद्योग सुरू राहतील
- खासगी कार्यालये बंद
- सरकारी कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरू
- वैद्यकीय सेवा सुरू राहतील
- मार्च एंडिंगशी निगडीत लेखा विषयक कामांना परवानगी
- माध्यम प्रतिनिधींनीही RTPCR चाचणी करून बाहेर निघावं
- खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरू राहणार
- जास्तीत जास्त लसीकरणावर भर देणार
- गृहविलगीकरणाच्या रुग्णांनी काटेकोर नियम पाळावे
शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई होईल