नितेश महाजन, झी २४ तास, जालना : वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाणीची घटना घडलीये. जालना शहरातील गीतांजली कॉलनीत ही घटना घडलीय. महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात आता चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतन सोनावणे असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून अजीज खान असं मारहाण करणाऱ्या संशयीत आरोपीचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळच्या सुमारास गीतांजली कॉलनीत लाईटगेल्याचा फोन महावितरणचे कर्मचारी रतन सोनावणे यांना यांना आला. यावेळी ते वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले. मात्र पोलवर अंधार असल्यानं ते माघारी परतले. त्यांनतर पुन्हा ते विजेच्या दुरुस्तीसाठी गेले, त्यावेळी अजीज खान याने त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, नागरीकांनी महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन महावितरण अधिक्षक अभियंत्यांनी केलं आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर महावितरण कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. वीज वसुलीसाठी जाताना किंवा वीज तोडणीसाठी जाताना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी महावितरण कर्मचाऱ्यांनी केली आहे. 


marathi news mahavitaran worker beaten by ajij khan in jalana