नागपूर : दमनगंगा आणि तापी नदी जोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारं पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाचे काम येत्या तीन महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी लिहिलेल्या 'धांडोळा शेतीचा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारोह प्रसंगी गडकरी बोलत होते. तर शेतक-यांच्या आयुष्याच्या लेखाजोखा या पुस्तकाच्या रुपाने मांडण्याच्या प्रयत्न या पुस्तकात केल्याचं शोभाताई फडणवीस यांनी सांगितलं.


पाहा व्हिडिओ